गावाबद्दल माहिती
पाटणच्या उत्तरेला गोलाकार डोंगराच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे संभाजीनगर. ज्याचे पूर्वीचे नाव वेखंडवाडी असे होते. हे गाव अत्यंत सदन आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे आहे.
गावाची लोकसंख्या जनगणना सन २०११ नुसार १४३० आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून ऊस, ज्वारी, तांदूळ, गहू आणि भाजीपाला ही मुख्य पिके घेतली जातात. गावात आदर्श प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पाण्याची टाकी, वाचनालय आणि ग्रामपंचायत कार्यालय अशा सुविधा उपलब्ध आहेत. भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, व्यंगटाई देवी मंदिर आणि पारंपरिक जत्रा हे गावाचे आकर्षण आहे. संभाजीनगर गाव स्वच्छता, ऐक्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास यासाठी पाटण तालुक्यात ओळखले जाते.
या गावात पोहोचण्यासाठी सातारा शहरातून नागठाणे सासपडे मार्गे जाता येते. सातारा ते पाटण अंतर सुमारे ६० किलोमीटर असून, पाटण ते संभाजीनगर सुमारे २३ किलोमीटर आहे. या मार्गावर पक्का रस्ता असून एस.टी. बस, जीप आणि खासगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन तारगाव आहे, तेथून नागठाणे मार्गे तसेच काशीळ तारळे बसने संभाजीनगर गाठता येते. संभाजीनगरकडे जाणारा मार्ग निसर्गरम्य असून, डोंगर, शेती आणि हिरवाईने नटलेला आहे.